३० लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन

खेड:- शहरातील गुलमोहर पार्क येथील गहाण ठेवलेल्या मिळकतीची विक्री करत एकाची ३० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या २ संशयितांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.संशयितांच्या वतीने अँड. स्वरूप थरवळ यांनी काम पाहिले.

जावेद युसुफ परकार व महम्मद हनिफ मुल्ला अशी संशयितांची नावे आहेत. १० जुलै २०१७ ते १३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मिळकत निर्वेध असल्याचे भासवत ३० लाख ८४ हजार ५०० रुपयांची फसवणूक कल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.