रत्नागिरी:- जिल्ह्यात तपासणीसाठी 4 हजार 643 नमुने घेण्यात आले होते. यापैकी 92 नमुने पॉझिटीव्ह तर तब्बल 4 हजार 26 नमुने निगेटिव्ह आले आहेत. 517 नमुने प्रलंबित आहेत. परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येकाला क्वारंटाईन केले जात असून होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 17 हजार 769 वर पोहचली आहे.
जिल्ह्यात येण्यासाठी 43 हजार 971 जणांनी अर्ज केले आहेत तर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी तब्बल 52 हजार 959 जणांनी अर्ज केले आहेत.
परप्रांतातून आलेल्या आणि जिल्ह्यात थांबलेल्या व्यक्तींसाठी जिल्हयात 63 निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. यात 140 जणांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या 12 जणांच्या जेवणाची व्यवस्था, शिवभोजन थाळी, तहसिल कार्यालये आणि NGO च्या माध्यमातून करण्यात आली आहे.