हॉटेलमध्ये चोरीचा प्रयत्न करणारा पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा येथे हॉटेलच्या काउंटरमधील नोकराने पैसे चोरताना मालकाने सीसीटीव्हीद्वारे रंगेहाथ पकडल्याची घटना 26 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वा. च्या सुमारास घडली. मनोहर संभाजी चव्हाण (22, गोळवली, राउळवाडी, संगमेश्वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत प्रशांत बापुराव विलणकर (64, साईसदन, मुरुगवाडा, कार्नरभैरी मंदिराजवळ, रत्नागिरी) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत विलणकर यांचे स्नॅक्स कार्नर जुना भैरी मंदिर मुरुगवाडा येथे हॉटेल आहे. 26 नोव्हेंबर रोजी प्रशांत हे हॉटेल बंद करुन घरी गेले होते. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरा रात्री 10 वा. च्या सुमारास चेक करत होते. यादरम्यान मनोहर चव्हाण हा काउंटरचा ड्रॉव्हर उघडण्याचा प्रयत्न करीत असताना दिसला. लगेचच ते घरातून हॉटेलमध्ये आले. आणि हॉटेलमध्ये मनोहर चव्हाण याला रंगेहाथ पकडले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मनोहर याला ताब्यात घेउन शहर पोलीस स्थानकात आणले. त्याच्यावर भादविकलम 457, 380, 511 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.