हरचेरी-डोंगरवाडी येथे तरुणाला मारहाण

रत्नागिरी:- तालुक्यातील हरचेरी-डोंगरवाडी येथे अज्ञात कारणातून मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना सोमवार 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 ते 6.30 वा.दरम्यान घडली आहे.

याप्रकरणी योगेश चाळके, अथर्व शिंदे (रा.डोंगरवाडी,रत्नागिरी),स्वरुप जयसिंग राउत (रा.हरचेरी,रत्नागिरी)आणि विघ्नेश भाटकर (रा.तोणदे,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत.याबाबत स्वरुपच्या आई देवयानी जयसिंग राउत (42,रा.हरचेरी कसबा तेलीवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,सोमवारी सायंकाळी योगेश चाळके आणि अथर्व शिंदे दोन्ही संशयित त्यांच्या घरी गेले त्यांनी फिर्यादींना तुमचा मुलगा स्वरुप कोठे गेला असे विचारले.तेव्हा त्यांनी स्वरुप घरात नसून त्याला फोन करुन बोलावून घेतले असतो संशयितांनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारुन जमिनीवर पाडले.त्यानंतर कोणत्यातरी हत्याराने त्याच्या पाठीवर वार करुन दुखापत केली.तर परस्पर विरोधी तक्रार देताना याप्रकरणी अथर्वच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार,सोमवारी सायंकाळी 6.30 वा.स्वरुप राउत आणि विघ्नेश भाटकर त्यांच्या घरी हातात लाकडी दांडका घेउन गेले होते.त्याठिकाणी अथर्व कुठे गेला असे विचारुन तो घरात मिळून न आल्याने संशयितांनी फिर्यादीला शिवीगाळ करत तुझा मुलगा भेटेल तिथे ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी संशयितांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 324, 323, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.