‘हर घर नल से जल’ योजनेतून 35 गावांना शंभर टक्के पाणीपुरवठा 

रत्नागिरी:- जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर नल से जल’ यामधून घरोघरी शंभर टक्के नळ जोडणी असलेल्या १२५ गावांपैकी ३५ गावांची नावे लवकरच घोषित करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिली.

जल जीवन मिशन हा केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत असून योजनेंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे किमान ५५ लिटर प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा केला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जल जीवन मिशन अतंर्गत २०२१-२२ मध्ये ११८१ योजना मंजूर होत्या. त्यात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत १०४ योजनांचा समावेश होता. २०२२-२३ मध्ये १४७५ योजनांचा ८२० कोटी ४० लाखाचा आराखडा तत्कालीन पालकमंत्री यांच्यामार्फत मंजूर आराखडा शासनास सादर केला आहे. त्यापैकी एकूण ८७९ योजनांचे तांत्रिक मान्यता देण्यात आली. ५६९ योजनांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. मंजूर असलेल्या कामांपैकी २८८ सुरु असून ३३ कामे पूर्ण करण्यात आली. जल जीवन मिशन अंतर्गत तांत्रिक सल्लागार म्हणून ४ संस्थांची निवड करण्यात आली असून, १४७५ योजने पैकी ३०५ योजनांचे अंदाजपत्रक व प्रस्ताव तयार करण्याचे काम तांत्रिक सल्लागार संस्थांकडे देण्यात आले आहे. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांची गुणवत्ता तपासणीसाठी राज्य पाणी व स्वच्छता मिशन, नवी मुंबई यांनी संस्थेची निवड केली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम राबविला जातो.