सांभाळण्यासाठी दिलेली रोकड, सोन्याचे दागिने परत न देता दीड लाखांची फसवणूक

 रोख रक्कमेसह सोन्याचे दागिन्यांची फसवणूक, संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- सोबत काम करणाऱ्याकडे दिलेले रक्कम व सोन्याचे दागिने परत न देता १ लाख ६१ हजार ७४५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला. राम केशव यमगर (रा. कारवांचीवाडी- रत्नागिरी, मुळ- आशानगर, एमआयडीसी सोलापूर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना डिसेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ या कालवधीत झाडगाव- मुरुगवाडा, रत्नागिरी येथे घडली. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुशांत सुनिल जोशी (वय ३४, रा. मुरुगवाडा-झाडगाव, रत्नागिरी) यांच्या सोबत काम करणारा संशयित राम यमगर यांच्याकडे ८२ हजार ७४५ रोख रक्कम तसेच २८ हजार रुपयांचे ११.५६ ग्रॅम वजनाची १८ इंच लांबीची सोन्याची चेन, ११ हजाराची ४.५ ग्रॅम सोन्याची अंगठी, ५ हजाराचे सोन्याचे लॉकेट, १० हजार किमतीची सोन्याची अंगठी तसेच २५ हजार किमतीच्या दोन अंगठ्या असा सुमारे १ लाख ६१ रुपयांचा मुद्देमाल दिला होता. तो परत मागीतला असता संशयिताने उडवाउडवीची उत्तर दिले. फोन स्विच ऑफ करुन ठेवला मुद्देमाल परत न देता फसवणूक केल्या प्रकरणी सुशांत जोशी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक साळुंखे करत आहेत.