रत्नागिरी:- शहरातील माळनाका येथील स्कायवॉक येथील प्रस्तावित व्हर्टीकल गार्डनची आपल्याला कोणतीही कल्पना मुख्याधिकार्यांनी दिलेली नव्हती. मात्र याविषयावरुन आपण मुख्याधिकार्यांना योग्य समज दिली असून, व्हर्टीकल गार्डनची त्यांची संकल्पना काय आहे हेही समजून घेतल्याचे पालकमंत्री उदय सामंतय यांनी सांगितले.
रत्नागिरीतील माळनाका येथील उड्डानपुलावर 26 लाख खर्च करुन व्हर्टीकल गार्डन उभारण्याबाबत नगर पालिकेने निविदा काढली आहे. यावरुन विविध राजकीय पक्षांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. आधी शहरातील अन्य गार्डनची डागडुजी करा मग व्हर्टीकल गार्डन उभारा असे मत मांडले आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारण्यात आला असता, आपल्याला याबाबत काहीच माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र याविषयावरुन आपण मुख्याधिकार्यांशी चर्चा केली असून, योग्य समजही देण्यात आली आहे. परंतु व्हर्टीकल गार्डनची संकल्पना नेमकी काय आहे हेही आपण समजून घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी शहरात गेल्या काही दिवसात सामाजिक चिंता निर्माण करणारे गुन्हे घडत आहेत, याबाबत पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी आपण चर्चा केली असून, लवकरच ते याबाबतची अॅक्शन दाखवतील असेही त्यांनी सांगितले.
जेके फाईल्स कर्मचार्यांनी त्यांना आवश्यक असणारे प्रपोजल आपल्याकडे दिले असून आपण ते कंपनी मॅनेजमेंटला दिलेले आहे. याबाबत आठ दिवसात बैठक होईल असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.