विनापरवाना गुरे वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

संगमेश्वर:- तालुक्यातील मोजे नायरी ते संगमेश्वर जाणाऱ्या रोडवर कोंडउमरे गावाजवळील रस्त्यावर बोलेरो पिकअप गाडीमध्ये गुरे भरून विनापरवाना वाहतूक करणाऱ्या दोघांना संगमेश्वर पोलिसांनी पकडले असून संगमेश्वर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर भागोजी वाघमोडे (२७, रा. चांदोली तालुका शाहूवाडी) व सुदेश सिद्धार्थ सावंत (रा. तांबेडी बौद्धवाडी) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शंकर वाघमोडे व सुदेश सावंत हे २९ जानेवारी रोजी मौजे नायरी ते संगमेश्वर रोडवर कोंडउमरे गावाजवळील रस्त्यावर त्यांच्या ताब्यातील बोलेरो पिकअप (क्र. एच ०८ डब्ल्यू ३४९१) गाडीमध्ये दोन गुरे गाडीच्या हौद्यात दाटीवाटीने भरून विनापरवाना वाहतूक करत र असल्याची माहिती संगमेश्वर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन कामेरकर, विनय मनवळ, उत्तम सासवे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी येथे जावून विनापरवाना गुरे वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला. विनापरवाना गुरे वाहतूक केल्याप्रकरणी शंकर वाघमोडे व सुदेश सावंतवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.