वडिलोपार्जित शेतजमिनीवर नाव लावण्यासाठी लाच स्वीकारताना तलाठ्यासह मंडल अधिकारी जाळ्यात

संगमेश्वर:- वडिलोपार्जित शेतजमिनीवर सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करून ते मंजुरीसाठी पाठविण्याकरिता तक्रारदाराकडून 25 हजारांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. देवळे येथील मंडळ अधिकारी उल्हास विश्वनाथ मुरुडकर (वय ४६, देवळे, ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) आणि कानाकडी येथील तलाठी संतोष महादेव मोघे, (ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे की, दोघांनीही 25 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तलाठी संतोष मोघे याने 28 रोजी मोबाईल फोनची मागणी केली होती. सदरची नोंद मंजूर करण्याकरिता मंडळ अधिकारी यांनी दिनांक 28/02/2023 व दिनांक 13/03/2023 रोजी 25,000/- रू. लाच रक्कमेची मागणी करून 25,000/- रू. लाच स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच तलाठी यालाही रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.