लाकडी दांडा डोक्यात मारल्याने वृद्ध जखमी

रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथील वृद्ध जखमी अवस्थेत आढळला. उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला. शहर पोलिस ठाण्यात या बाबत नोंद करण्यात आली आहे. मनमोहन शंकर मुसळे (वय ८३, रा. आठवडा बाजार, सुलभ शौचालयाच्या बाजूला, रत्नागिरी) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ९) रात्री एकच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनमोहन मुसळे हे शौचालयाच्या बाजूला खाटेवर झोपलेले असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार केला. सकाळी सहाच्या सुमारास श्री. कदम हे सुलभ शौचालय उघडण्यासाठी गेले असता त्यांना मुसळे हे जखमी अवस्थेत दिसले. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.