लाकडाच्या वादातून मारहाण प्रकरणी पाचजणांवर गुन्हा

खेड:- रस्त्याच्या कडेला ठेवलेली लाकडे कधी उचलणार अशी विचारणा केली म्हणून त्याचा राग आल्याने ५ जणांनी पुरे बु . येथील शरद भास्कर मंडलिक यांना मारहाण केली. या प्रकरणी पाचजणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत परशुराम जाधव (६१), अलंकार अनंत जाधव (२९ ), विशाल विश्वनाथ जाधव (३४), दीपक विश्वनाथ जाधव (३८ ), नामदेव मारुती महाडिक (४० ,सर्व रा . पुरे बु . ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रस्त्याच्या कडेला ठेवलेली फाटी कधी उचलणार यातून वाद निर्माण झाला. त्यामध्ये भांडण करू नका फाटी उचलली जातील असे सांगितले. मात्र संशयितांना राग आल्याने ५ जणांनी गैरकायदेशीर जमाव तयार करुन त्यांना पकडून ठेवून दगड व काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये शरद मंडलिक यांच्या उजव्या डोळ्याच्या वरील बाजुस कपाळावर गंभीर दुखापत झाली असुन जखमेच्या ठिकाणी चार टाके पडलेले आहेत. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.