राजापूर:-राजापूर तालुक्यातील पडवे येथे ४८ वर्षीय व्यक्तीला एसबीआय बँक अकाऊंटमधून ऑनलाईन बील अपडेटसाठी लिंक पाठवून ॲप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर बँक मधून ७० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे लक्षात येताच नाटे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
याबाबतची फिर्याद मंदार मधुकर पेळपकर ( ४८ , पडवे , राजापूर ) यांनी पोलीस स्ट ज्ञानकात दिली . त्यानुसार अज्ञातावर भादविकलम ४२० , ४१ ९ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ( क ) , ( ड ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.