लांजात सहावीतील मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा मुख्याध्यापक फरार

लांजा:– लांजा येथे सहावीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा मुख्याध्यापक फरार झाला आहे. या घटनेने ग्रामस्थ आणखी आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी या मुख्याध्यापकाला शोधण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

गवाणे केंद्र शाळा नंबर १ मधील मुख्याध्यापक नथू सोनवणे याने सहावीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. या नंतर रविवारी २४ एप्रिल रोजी ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे मुख्याध्यापक सोनवणे याच्यावर लांजा पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र दोन दिवसांपासून तो बेपत्ता असल्याने त्याला अद्यापही अटक झालेले नाही. 

लांजा पोलीस त्याच्या लांजा रेस्ट हाऊस येथील राहत्या घरी जाऊन आले. मात्र घर बंद असून तो फरार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी लांजा पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. या घटनेनंतर गवाणेसह तालुक्यातुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.