लांजा कोर्ले येथे बोरिवली – कणकवली बसला अपघात

लांजा:- शहरातील कोर्ले फाट्यानजीक बोरिवली – कणकवली एसटी बसला अपघात झाला. या अपघातात एसटी बस रस्ता सोडून थेट वीस फूट खोल खाली खड्ड्यात उतरली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

कणकवली आगाराची बोरिवली – कणकवली ही बस (क्र. एम.एच.14 बीटी 2636) बोरिवली येथून कणकवली येथे जात असताना लांजा शहरातील कोर्ले फाटानजीकच्या वळणावर ही बस थेट रस्ता सोडून वीस फूट खड्ड्यात खाली उतरली. या बसमधून 7 प्रवासी प्रवास करत होते. मात्र प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून ही बस येथील वहाळात पलटी होता-होता बालंबाल बचावली. त्यामुळे सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातग्रस्त प्रवाशांना दुसऱ्या एसटी बसने पुढे मार्गस्थ करण्यात आले. या अपघाताची माहिती बसचालकाने लांजा एसटी आगाराला दिली. त्यानंतर लांजा आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.