लांजा:- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ८ मे व जून २०२४ या कालावधीत जिल्ह्यात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एका तरुणीला राज राजू वर्मा (वय २२) या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून गैरफायदा घेतला. यामुळे तरुणी आठ महिन्यांची गरोदर आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने सुरुवातीला १२ जानेवारीला नवी मुंबईत फिर्याद दिली होती. पोलिसांनी संशयित राज वर्मा या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक देवकन्या मैंदाड करत आहेत.