रत्नागिरी:- सोमवारी जाहीर झालेल्या राजापूर अर्बन बँकेच्या निवडणुकीत राज्याचे उद्योगमंत्री ना. सामंत यांचे रत्नागिरी आणि सिंधदुर्ग जिल्ह्यात असलेले प्राबल्य दिसून आले आहे. निकालात अल्ताफ संगमेश्र्वरी यांचा मोठा विजय झाला. ३ हजार १४४ मतांपैकी तब्बल १ हजार ५९५ मते घेत अल्ताफ संगमेश्र्वरी विजयी झाले.
राजापूर अर्बन बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. ही निवडणूक ना. सामंत यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली. या निवडणुकीत अल्ताफ संगमेश्र्वरी यांना उमेदवारी देण्यात आली. झालेल्या मतदानात रत्नागिरीत संगमेश्र्वरी यांना ८०० पैकी ५०० मते मिळाली. लांजा येथे २५०, वैभववाडी ३०८ देवगड १५५, कुडाळ ७२ मते मिळाली. संगमेश्वरी यांच्या विरोधात दोन उमेदवार उभे होते. दोन्ही उमेदवारांना धूळ चारत अल्ताफ संगमेश्र्वरी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या निवडणुकीच्या निकालात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ना. सामंत यांचे असलेले प्राबल्य पुन्हा अधोरेखित झाले आहे.