रत्नागिरी:- कोकण पदवीधर मतदारसंघात प्रचाराला चांगलाच रंग चढताना दिसत आहे. कोकण विभागात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि कॉंग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष, कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष रमेश कीर यांच्या उमेदवारीमुळे निवडणुक चुरशीची झाली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच शनिवारी विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून रमेश कीर यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी रमेश कीर यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा उपस्थित होते.