राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद किर यांची मागणी
रत्नागिरी:- जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वजनिक निवडणुका ठरलेल्या मुदतीत घेण्यात याव्यात. मात्र आपल्याकडुन अजुनही आरक्षण, मतदार याद्या प्रसिद्ध करणे, वॉर्ड रचना रेखांकित करणे अशी प्रक्रिया सुरू झालेली नाही. तरी कोणताही विलंब न लावता पुढील निवडणुकीची कार्यवाही सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष मिलिंद कीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रत्नागिरी पालिकेची येत्या डिसेंबर महिन्यामध्ये (२०१६ ते २०२१) मुदत संपत आहे. त्यामुळे नव्याने पंचवार्षिक निवडणुक घेणे गरजेचे आहे. निवडणुक आयोगाचे संकेतस्थळ (वेबसाईट) पाहिली असता निवडणुक डिसेंबरपूर्वीच होणार असल्याचे दिसून येत आहे. तरी आपल्याला या निवडणुका वेळेतच घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी आरक्षण जाहीर
करणे, मतदार यादी प्रसिद्ध करणे व या सारखे कार्यक्रम तात्काळ होणे आवश्यक आहेत. मात्र आपल्याकडुन अजुनही आरक्षण जाहीर झालयाचे दिसून येत नाही. मतदार याद्या प्रसिद्ध करणे, वॉर्ड रचना रेखांकित करणे, हे कार्यक्रम आपल्या कार्यालयाकडुन किंवा संबंधित कार्यालयाकडुन तात्काळ होणे गरजेचे आहे. तरी कोणताही विलंब न लावता पुढील निवडणुकीची कार्यवाही सुरू करावी ही विनंती, असे कीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.