रत्नागिरीतील वीज कर्मचारी, अधिकारी संपावर

रत्नागिरी:- ऊर्जा सचिव आणि तिन्ही वीज कंपनी प्रशासनासोबत वाटाघाटीत सामंजस्य करार न झाल्याने दीड लाखांवर वीज कामगार, कर्मचारी, अभियंते आणि अधिकार्‍यांनी संप पुकारला आहे. सोमवारी रत्नागिरी येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयासमोर कर्मचार्‍यांनी धरणे, निदर्शने, आक्रोश आंदोलन केले.

केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे धोरण, महावितरणचा मनमानी कारभारामुळे तिन्ही वीज कंपन्यांतील वीज कामगार ते अधिकारी हैराण झाले आहेत. केंद्र सरकारने विद्युत विधेयक 2021 आणले आहे. त्यामुळे राज्यातील 6 जलविद्युत प्रकल्पाचे खासगीकरण करण्याचा डाव आखला जात आहे, तो रद्द करावा. 16 शहरांत महावितरणऐवजी फ्रँचायजी नेमण्यासाठी हलचाली सुरु आहेत. याबाबत सत्य काय ते स्पष्ट करावे.खासगीकरण करून नये. 30 हजार कंत्राटी कामगारांना वयाच्या 60 वर्षापर्यंत नोकरीचे सरंक्षण द्यावे. कंपन्यांनी रिक्त पदावर नोकर भरतीयासह विविध प्रश्नांकडे लक्षच दिले गेले नाही.
या विषयी वारंवार आवाज उठवूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे 41 संघटनांनी एकत्रित येऊन 28 व 29 मार्च रोजी संप पुकारण्याचा इशारा दिला होता.त्यानुसार सोमवारी सकाळी रत्नागिरीच्या विभागीय कार्यालयासमोर कर्मचार्‍यांनी संपात सहभागी होत आंदोलन केले.