रत्नागिरीत गांजा विरोधात पुन्हा मोठी कारवाई; वोल्वो बसमधून जवळपास 2 किलो गांजा जप्त

रत्नागिरी:- रत्नागिरीत गांजा विरोधात पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे वोल्वो बसमधून तब्बल 2 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही धडक कारवाई केली. गांजा वाहतूक प्रकरणी वोल्वो बस चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. 
 

यापूर्वी देखील रत्नागिरी पोलिसांकडून गांजा पुरवणारे रॅकेट उध्वस्त करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी एमआयडीसी येथून गांजा जप्त करण्यात आला होता. तरीदेखील रत्नागिरीत गांजा पुरवण्यासाठी तस्कर विविध शक्कल लढवत आहेत. शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे बसमधून गांजा वाहतूक होणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. रत्नागिरीत गांजा सप्लाय करण्यासाठी वोल्वो बसचा आधार घेण्यात आला होता. मात्र हा डाव एलसीबीच्या टीमने उधळून लावला.