रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात गांजा विकण्यासाठी आलेल्या टोळक्याच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. टोळीतील चौघांना पकडण्यात यश आले असून त्यांच्याकडून 667 ग्रॅमचा वजनाचा गांजा ताब्यात घेण्यात आला आहे.
10 ते 13 ग्रॅम वजनाच्या गांजाच्या 63 पुड्या बनवून त्या पुड्या विकण्यासाठी खान कॉम्प्लेक्स येथे आले होते. पोलिसांनी हि खबर मिळताच शहर पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यामध्ये बिलाल अश्रफ शेख, सलमान कोतवडेकर, संजय राणा आणि रामपाल राणा यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडील 776 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे अशी माहिती शहर पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी दिली. चौघांनी 10 ते 13 ग्रॅमच्या पुड्या बनवून विकण्यासाठी आणल्या असताना ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले. त्यांच्याकडील 63 पुड्या पोलिसांनी जप्त केल्या.