रत्नागिरी:- रत्नागिरीत रविवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. मात्र या विसर्जनाला रविवारी रात्री गालबोट लागले. शहरानजिक भाट्ये टाकले समुद्रकिनारी विसर्जनासाठी गेलेले दोघे बुडल्याची घटना घडली.
दीड दिवसाच्या बाप्पांना रविवारी निरोप देण्यात आला. मात्र या निरोपाला गालबोट लागले. शहरानजिक भाट्ये टाकले येथे विसर्जनासाठी गेलेले दोघे बुडाल्याची घटना घडली. या दोघांचा शोध रात्री उशिरा पर्यंत सुरू होता. पोलीस, महसूल आणि स्थानिक प्रशासन शोधकार्य सुरू होते.