रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि परिसरात कोरोनाचा वेगाने फैलाव होताना दिसून येत आहे. रविवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार तालुक्यात नव्याने 23 रुग्ण सापडले आहेत. यातील 12 रुग्ण एकट्या रत्नागिरी शहरात सापडले आहेत. यात थिबा पॅलेस आणि शिवाजी नगर परिसरात प्रत्येकी 3-3 रुग्ण सापडले आहेत.
दरम्यान रविवारी रात्री तालुक्यात नव्याने 23 पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले आहेत. नव्याने सापडलेल्या 23 रुग्णांपैकी एकट्या रत्नागिरी शहरात 12 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात थिबा पॅलेस परिसरात पुन्हा तीन रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून थिबा पॅलेस परिसरात कोरोना बाधित रुग्ण झपाटयाने वाढत आहेत. या परिसरात आता पर्यंत 20 रुग्ण सापडून आले आहेत. याशिवाय शिवाजी नगर येथे देखील 3 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तसेच फगर वठार, मारुती मंदिर, जोशी पाळंद, सन्मित्र नगर, कोकण नगर, माळनाका आणि जेल रोड या भागात रुग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात हातखंबा, कारवांची वाडी, कर्ला, वांद्री तील 2 (एडमिट), कापसाळ चिपळूण (ऍडमिट), निवळी, गुहागर (ऍडमिट), हर्णे (ऍडमिट), गणेश कॉलनी टीआरपी येथे नवे रुग्ण सापडले आहेत.