रत्नागिरी:- रत्नागिरी शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांची बदली नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर करण्यात आली आहे. गेले अडीच वर्ष रत्नागिरीत उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास केला होता. त्यातील आरोपींना गजाआड करण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून श्री. सदाशिव वाघमारे यांनी रत्नागिरी, देवरुख, पूर्णगड, रत्नागिरी ग्रामीण, जयगड या आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्थानकांवर आपला वाचक ठेवला होता. तेथे घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत त्यांनी संबंधित प्रभारी अधिकारी यांना अचूक मार्गदर्शन केले होते. कोरोना काळात सुद्धा त्यांनी चांगला समन्वय ठेवून काम केले होते. त्याचा फायदा रत्नागिरीकर यांना झाला. रत्नागिरीत झालेल्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.