रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील माहे जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या रत्नागिरी तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींची प्रभाग आरक्षण सोडत दि. 6 जून रोजी सकाळी 10 वाजता त्या त्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेत होणार आहे.यासाठी 33 अध्यासी अधिकारी यांची नेमणूक तहसिलदार शशिकांत जाधव यांनी केली आहे.
ग्रामपंचायतींचे अंतिम प्रभाग रचना कार्यक्रम दि.27 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. राज्य निवडणूक आयोगाने या 33 ग्रामपंचायतींचा आरक्षण कार्यक्रम प्रसिध्द केलेला आहे. यानुसार तहसीलदार रत्नागिरी श्री शशिकांत जाधव यांनी या 33 ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण टाकण्यासाठी 33 अध्यासी अधिकारी यांची नेमणूक केलेली असून आरक्षण टाकण्याची कार्यवाही त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये दि. 6 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. सदर आरक्षण सोडतीसाठी संबधित ग्रामपंचायतीच ग्रामसेवक,ग्राम विकास अधिकारी यांना विशेष ग्रामसभा आयोजित करण्याची सूचना तहसीलदार रत्नागिरी श्री जाधव यांनी दिली आहेत.या ग्रामसभेस नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार शशिकांत जाधव यांनी केले आहे.
प्रभाग आरक्षण सोडत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये गावडे आंबेरे,शिरगांव, निवळी, भगवतीनगर, साठरे, धामणसे, पोमेंडी बुद्रुक, पुर्णगड, जांभारी,चाफेरी, गणेशगुळे, पिरंदवणे, निरुळ, फणसवळे, केळये, कासारवेली, वेळवंड, चांदोर, तोणदे, मावळंगे,चरवेली,वेतोशी, सत्कोंडी, वळके, तरवळ, विल्ये, बोंड्ये, टिके, टेंभ्ये, निवेंडी, मालगुंड, करबुडे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.