रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची स्थिती आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तीन बळी घेतले असून तिन्ही बळी रत्नागिरी तालुक्यातील आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 94 झाली असून 101 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून बाधितांची संख्या 2 हजार 681 झाली आहे.
गेल्या 24 तासात जिल्ह्यात ॲन्टीजेन चाचणीत 60 तर आरटीपीसीआर चाचणीत 41 असे एकूण 101 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2681 इतकी झाली. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी 31, कळबणी 13, गुहागर 19, दापोली 4 मंडणगड 1, कामथे 20, राजापूर 4, घरडा रुग्णालय 9 अशा एकूण 101 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.
आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील 75 वर्षीय रुग्ण, किर्तीनगर रत्नागिरी येथील 58 वर्षीय रुग्ण आणि मिरकरवाडा रत्नागिरी येथील 58 वर्षीय कोरोना रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे एकूण मृत्युसंख्या आता 94 झाली आहे.