रत्नागिरी:-शहरातील एमआयडीसी कालिका नगर येथे शहर पोलिसांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी धाड टाकून 1 हजार 800 रुपयांचा 110 ग्रॅम गांजा पकडला.या कारवाईत पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून गेल्या काही दिवसांमधील ही तीसरी कारवाई आहे.
शहर पोलिसांना एमआयडीसी येथे गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, शहर पोलिसांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी त्याठिकाणी सापळा लावला होता.सायंकाळी 5 वा.सुमारास पोलिसांना त्याठिकणी एक अल्पवयीन मुलगा संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्यावर पोलिसांनी त्याची चौकशी करुन तपासणी केली असता त्याच्याकडून एकूण 110 ग्रॅम वजनाच्या गांजाच्या 6 पुड्या मिळून आल्या. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.