रत्नागिरी:- रत्नदुर्ग किल्ल्यावरून एका २२ वर्षीय तरुणीने उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार सायंकाळी साडेचारच्या सुमारास उघडकीस आला. दरम्यान, या तरुणीची ओळख अद्याप पटली नसून सायंकाळी उशीरापर्यंत तिचा मृतदेह खडकातून बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
आत्महत्या केलेल्या तरुणीचे अंदाजे वय २० ते २२ वर्षे असून तिची अद्याप ओळख पटलेली नाही. तिच्या चेहर्यावर गंभीर दुखापती झाल्या आहेत. मोठ्याप्रमाणात रक्तस्त्रावदेखील झाला आहे. त्यातच तिचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, २२ वर्षीय तरुणीने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आत्महत्या की घातपात याबाबतदेखील चर्चा असून या तरुणीची ओळख पटल्यानंतरच सारा प्रकार उघडकीस येणार आहे.