रत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा येथील बंद घर फोडून रोख 3 लाख 27 हजार रुपये लांबवले. हि घटना 14 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 ते मध्यरात्री 1 वा. कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी फिर्यादीने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, काही कामानिमित्त ते कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा उठवत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा कोणत्यातरी हत्याराने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घराच्या पहिल्या मजल्यावरील कपाटातून रोख 3 लाख आणि दुसऱ्या कपाटातील पर्समधून 27 हजार असे एकूण 3 लाख 27 हजार रुपये चोरून नेले.याप्रकरणी अज्ञाताविरोधात भादवी कायदा कलम 457,380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.