रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील निगडे गावानजीक दोन स्वीफ्ट कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांमधील 9 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जण गंभीर जखमी असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले आहे.
हा अपघात मुंबई गोवा महामार्गावर निगडे गावानजीक पेट्रोल पंपासमोर मंगळवारी झाला. सावंतवाडी येथील शिवलकर कुटुंबीय सावंतवाडी ते मुंबई असे आपल्या ताब्यातील स्वीफ्ट डिझायर कारने प्रवास करत होते. मात्र वाटेतच मुंबई गोवा महामार्गावर खेडमधील निगडे गावानजीक पेट्रोल पंपासमोर ते आले असता समोरून खेड ते चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या स्वीफ्ट कारचा आणि त्यांच्या स्वीफ्ट डिझायर कारमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात शिवलकर कुटुंबातील सहा जण तर स्वीफ्ट कारमधील तीन जण जखमी झाले आहेत.