रत्नागिरी:-मिरजोळे पाटीलवाडी येथील उतारात अॅपे टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जहूर फकीर महमंद धर्मे (68, केळये मुस्लीमवाडी) हे आपल्या ताब्यातील अॅपे टेम्पो घेवून कोकणनगर ते मिरजोळे असे जात असताना पाटीलवाडी येथील उतारात टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेम्पो पलटी झाला. यात 5 जण जखमी झाले. स्नेहा सुरेश कांबळे (40), ॠतिक दीपक कांबळे (20, दोन्ही भावेआडम, बौध्दवाडी), दिलशाद हिम्मत मजगावकर (मजगाव), दिपिका कांबळे (भावेआडम), सुवर्णा कांबळे (भावेआडम) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबतची फिर्याद पोलीस नाईक रुपेश भिसे यांनी शहर पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार टेम्पो चालक जहूर फकीर महमंद धर्मे यांच्याविरोधात भादविकलम 279, 337, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.