रत्नागिरी:- रत्नागिरी मिरजोळे एमआयडीसी परिसरातून वाहणाऱया नाल्यामध्ये मोठ्यापमाणात त्या परिसरातील कंपन्यांतून पदुषणयुक्त सोडले जात असल्याने मिरजोळे जांभूळफाटा परिसरातील ग्रामस्थ पदुषणाच्या विळख्यात सापडले आहेत. या परिसरातील मत्स्य पकिया करणाऱया कंपन्यांमधून हे पाणी सोडले जात असल्याचा आरोप या परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. संबधित कंपन्यांनी तातडीने उपाययोजना करावी अन्यथा या पदुषणाविरोधात कंपन्यांवर धडकमोर्चा काढण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
मिरजोळे एमआयडीसी परिसरातून जांभूळफाटा या भागाकडे वाहणाऱया नाल्यामध्ये कंपन्यांचे मोठ्यापमाणात सांडपाणी सोडले जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या प्रक्रियायुक्त पाण्यामुळे या भागात राहणारे राहणारे ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झालेले आहे. नाल्यात सोडले जाणारे पाणी पुढे जांभूळफाटा परिसरातील लोकवस्तीकडे वाहत जाते. त्या पाण्यामुळे नाल्यालगतच्या ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाणी विहीरी पदूषित झालेल्या आहेत. पाणी पिण्यास लायक नसल्याने त्या ग्रामस्थांसमोर संकट उभे आहे. तसेच त्या पदूषित पाण्यामुळे आरोग्याचा पश्न उभा राहीला आहे.
यापूर्वी देखील कंपन्यांच्या या पाणी पदूषणाबाबत येथील पदुषण नियंत्रण महामंडळ, जिल्हा पशासन, एमआयडीसी विभाग यांच्याकडे निवेदने देण्यात आली आहेत. पत्यक्ष जागेवर अधिकाऱयांना पाचारण करून या पदूषण दाखवण्यात आले आहे. पण तरीही या परिसरात होत असलेले पदूषण रोखण्यासाठी संबधित यंत्रणेने कोणतीही कारवाई केलेली नाही. तर पाणी पदुषण करणाऱया कंपन्यांनीही या विभागांना जुमानले नसल्याची संतप्त भावना ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. पशासनाच्या डोळ्यात धुळफेक करत हे सांडपाणी पदूषण नाल्याद्वारे सुरूच आहे. हे पाणी जांभूळफाटा परिसरातून पुढे मिरजोळे गावाकडे नदीला जाउन मिळत असल्याने त्या परिसरात पदुषणाचा त्रास गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.
यापूर्वी ही बाब कंपन्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आलेली होती. पण त्याकडे उपाययोजना करण्याविषयी व ते पदूषण रोखण्याविषयी कानाडोळा करण्यात आलेला आहे. हे दूषित पाणी या परिसरातील नाल्याच्या जवळ असणाऱया मत्स्य पकिया करणाऱया कंपन्यातून सोडले जात असल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे. पण मत्स्य पकिया करणाऱया तेथील कंपन्यांच्या पतिनिधींनी आपल्या कंपनीतून पकियायुक्त दूषित पाणी सोडले जात नसल्याचे म्हटले आहे.
एमआयडीसी परिसरात उद्योगधंद्यांना ग्रामस्थांचा विरोध नाही, पण अशापकारे पदुषण केले जात असेल तर त्यावर तातडीने उपाययोजना केल्या जाव्यात. अन्यथा ग्रामस्थ कंपन्यांची पदुषणाबाबत बेफिकीरपणा सहन करणार नाहीत. लवकरच यावर उपायायोजना न झाल्यास पदुषण करणाऱया कंपन्यावर धडकमोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कंपन्यांनी सोडलेल्या पदूषित पाण्याची मंगळवारी पाहणी करतेवेळी ग्रामस्थ हर्षराज पाटील, ओंकार मजगावकर, प्रवीण पवार, प्रीतम चव्हाण, दिनेश पाटील, वैभव पाटील, प्रथमेश पाटील, छब्या किर, रत्नदीप पाटील, विकास पाटील, रोशन भाटकर, उमेश पाटील, वैभव जावकर, मीना ठीक, अक्षाया खेडेकर, अजु पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.