मारुती मंदिर येथे दुचाकीची महिलेला धडक; दोघे जखमी

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर परिसरात दुचाकीची पादचारी महिलेला धडक बसून झालेल्या अपघातात दोघेही जखमी झाले असून दुचाकिस्वाराला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे. अपघाताची ही घटना सोमवार 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वा. सुमारास घडली आहे.

साहिल संतोष रायकर (21,रा.निवखोल,रत्नागिरी) असे गंभीर जखमी दुचाकिस्वाराचे नाव आहे. तर शहनाझ यूनूस लांबे (45,रा. साठवली लांजा) असे पादचारी महिलेेचे नाव आहे. सोमवारी सकाळी साहिल आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच- 08-बीएफ- 0742) ही घेउन एमआयडीसी येथील नोकरीला जात होता. तो मारुती मंदिर परिसरातील साक्षि फूडस समोर आला असता रस्ता ओलांडणार्‍या शहनाझ लांबे या महिलेला त्याच्या दुचाकीची धडक बसून हा अपघात झाला. यात दोघही जखमी झाल्याने त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू साहिलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.