भोके-आंबेकरवाडी येथे शेतातील लोखंडी गेटची चोरी

रत्नागिरी:- तालुक्यातील भोके-आंबेकरवाडी येथील शेतजमीनीत अतिक्रमण करुन २५ हजाराचा लोखंडी गेट चोरुन नेणाऱ्या दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अनिस वेतोसकर व अभिषेक वेतोसकर (रा. आंबेकरवाडी, भोके, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना ८ ते १६ फेंब्रुवारी आंबेडकरवाडी-भोके येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दिनेश वचराज ओसवाल (वय ५८, रा. मारुतीआळी, रत्नागिरी) यांची आंबेकरवाडी, भोके येथे शेतजमीन आहे. या शेतजमिनीत अतिक्रमण करुन संशयितांनी फिर्यादी यांच्या जमीन हद्दीतील शेताचा गडगा पाडून शेतात प्रवेश करुन कंपाउंडाचा २५ हजाराचा लोखंडी गेट चोरुन नेला. या प्रकरणी ओसवाल यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.