रत्नागिरी:- शहरातील भगवती बंदर राजवाडी येथे एका प्रौढ बेशुध्दावस्थेत घरात आढळून आला होता. उपचारार्थ रुग्णालयात नेले असता त्याला वैद्यकीय सूत्रांनी मृत म्हणून घोषित केल्याची नोंद पोलिसात करण्यात आली आहे.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ ऑगस्ट रोजी रात्री घडली होती. रोहिदास हरिश्चंद मोंडकर (५२, रा. भगवती बंदर राजवाडी) असे त्या मृताचे नाव आहे. ते कंपनीत कामाला गेले नाहीत म्हणून कंपनीतील काही लोक त्यांना घरी बघण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. आत त्यांनी पाहिले असता रोहिदास हे घरात बेशुध्दावस्थेत पडलेले होते. त्यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय सूत्रांनी तपासून मृत झाल्याचे घोषित केले.