वळके नवी वसाहत येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

रत्नागिरी:- वळके नवी वसाहत येथील राजेंद्र शिवाजी दळवी यांच्या घराशेजारील विहिरीमध्ये भक्ष्याचा पाठलाग करीत असताना बिबट्या विहिरीत पडला. ही घटना आज सकाळी १० वाजता घडली.

याबाबत श्री. सौरभ खाके युवा कार्यकर्ते ,पाली यांनी दिलेल्या बातमीनुसार तात्काळ जागेवर वनखात्याची रेस्क्यू टीम पिंजरा घेऊन कर्मचार्‍यांसह आली. त्यांनी पिंजरा विहिरीत सोडला. पिंजर्‍यात जिवंत कोंबडी ठेवण्यात आली होती. परंतु पिंजरा खाली सोडून देखील तो पिंजर्‍यात येण्यास तयार नव्हता. शेवटी काही तास गेले आणि बिबट्याला जेरबंद करण्यास यश आले.

अशा प्रकारच्या घटना घडल्या किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर माहिती देणे बाबत आवाहन वनविभागाचे वतीने प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केले.