बेकायदेशीरपणे मुल दत्तक दिल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

बालन्याय अधिनियम नुसार कारवाई;
मुंबईतील जोडप्याकडून मुल घेण्याचा प्रयत्न

रत्नागिरी:- मुंबईतील जोडप्याकडून बेकायदेशीरपणे मुल दत्तक घेणाऱ्या दाम्पत्यासह पाच जणांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल़ा. मुल नसलेल्या या दापत्याने मुलाची नोंदणी करण्याचा प्रयत्न देखील केल्याचा प्रकार समोर आला आह़े यापकरणी पोलिसांनी संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून चौकशी करण्यात येत आह़े.

शहरालगतच्या परिसरात राहणाऱ्या दाम्पत्याला मुल नसल्याने मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आल़ा. या दाम्पत्याने आपल्या ओळखील लोकांशी संपर्क साधून बोलणी सुरू केल़ी. यावेळी मुंबई येथील जोडप्याची घरची परिस्थिती बेताची असल्याने व मुलाचा संभाळ करण्यास अडचणी येत असल्याने त्यांना आपले तीन महिन्यांचे बाळ दत्तक द्यावयाचे होत़े. ही बातमी रत्नागिरी येथील या दाम्पत्याला कळताच त्या जोडप्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आल़ा. पाथमिक बोलणीनंतर मुंबईतील हे जोडपे बाळ दत्तक देण्यास तयार झाल़े.
बाळाला दत्तक देण्यासाठी मुंबईतील जोडपे रत्नागिरी येथे आल़े. यावेळी ते शहरातील एका लॉजवर थांबले होत़े. यानंतर हे मुल रत्नागिरी येथील दाम्पत्याच्या स्वाधीन करण्यात आल़े. आपल्याला भविष्यात कोणत्याही अडचणी येवू नयेत म्हणून या बाळाची दत्तम नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आल़ा मात्र मुल दत्तक घेण्यासंबंधी शासनाचे नियम असल्याने हा सर्व पकार उघडकीस आल़ा. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरूद्ध बालन्याय अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आह़े.