बेकायदेशिरपणे मटका चालवणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर आणि राजीवडा येथे बेकायदेशिरपणे मटका खेळ चालवणार्‍या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12.10 ते 1.56 वा.कालावधीत करण्यात आली.

प्रतिप मारुती पाटील (45, रा.आठवडा बाजार, रत्नागिरी) आणि विकास कृष्णा चव्हाण (30, रा.परटवणे,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. हे दोघेही बेकायदेशिरपणे लोकांकडून पैसे स्विकारुन मटका जुगार चालवताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 811 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.