संगमेश्वर: तुरळ गुरववाडी येथे बांधावरून झालेल्या वादात वृद्धाला ढकलाढकल करून हाताने मारहाण करून बांबूचे काठीने उजव्या पायावर फटके मारून पायाचे हाड मोडले. हा प्रकार पाहणाऱ्याच्या डोक्यावर काठीने मारून गंभीर दुखापत केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुरळ गुरववाडी येथे राहणारे दत्ताराम गंगाराम गुरव (वय ७४) यांनी त्यांच्या घरालगत घातलेला चिऱ्याचा बांध हा सतीश सहदेव गुरव वगैरे यांचे वाट्याला आलेल्या जमिनीत घातलेला आहे असे सतीश सहदेव गुरव, स्वप्नील सहदेव गुरव, महेंद्र चंद्रकांत गुरव, सविता सहदेव गुरव यांचे म्हणणे आहे. त्यांनी २४ ऑगस्टला दुपारी तीन वाजता दत्ताराम गंगाराम गुरव यांनी घातलेला बांध तोडत असताना दत्ताराम यांनी तुम्ही बांध का तोडता, असे विचारले. या गोष्टीचा संशयितांना राग येऊन त्यांनी फिर्यादी आणि मनोज विष्णू गुरव (वय ४०) याच्या डोक्यावर काठीने मारून गंभीर दुखापती केली. सर्व संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून काठ्या जप्त करण्यात आल्या. पोलिस उपनिरीक्षक विवेक साळवी तपास करीत आहेत.