बांधकामावर मारलेले पाणी शेजारच्या घरात घुसल्याने जोरदार मारहाण 

रत्नागिरी:-घराच्या बांधकामावर मारलेले पाणी घरात आल्याबाबत आणि घराची रीप कापल्याचा जाब विचारला. या रागातून शेजाऱ्याला 4 जणांनी लाकडी रीप आणि सळईने मारहाण करून त्याच्या घरावर दगडफेक करत नुकसान केले. ही घटना रविवार 29 मे रोजी दुपारी 2.30 वा. सरोदेवाडी परटवणे येथे घडली.

राहुल शिवगण,आकाश रसाळ,रितेश देसाई, पंकज रसाळ (सर्व रा.सरोदेवाडी परटवणे, रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 4 संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात अमर अनंत शिवगण (27,रा.सरोदेवाडी परटवणे, रत्नागिरी ) यांनी  रात्री उशिरा तक्रार दिली आहे.त्यानुसार,रविवारी दुपारी राहुल शिवगणने आपल्या घराच्या बांधकामावर पाणी मारले. ते भिंतीवाटे अमर शिवगणच्या घरात गेले.तसेच राहुलने अमरच्या घराची रिपही कापली होती. याबाबत अमरने राहुलला जाब विचारला. या रागातून संशयितांनी संगनमताने अमरला लाकडी रीप आणि सळईने मारहाण करून त्याच्या घरावर दगडफेक केली.अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.