बंद फ्लॅट फोडून २ लाख ६३ हजाराचे दागिने लंपास

खेड:- तालुक्यातील पिरलोटे धामणंद येथील अज्ञात चोरट्याने बंद फ्लॅट फोडून २ लाख ६३ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना दि. १२ जुलै रोजी सकाळी ६. ४५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाज्याचे कडी कोयंडा कोणत्यातरी कठीण हत्याराने कट करुन प्लॅटमध्ये प्रवेश करुन बेडरुम मधिल असलेल्या लोखंडी कपाटातील लॉकर कोणत्यातरी कठीण हत्याराने तोडुन त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरुन नेले तसेच फिर्यादी यांचे आजुबाजूचे परिसरात तसेच शेजारी देखील कडी कोयंडा कट करुन चोरीचा प्रयत्न देखील केला.

याप्रकरणी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.