रत्नागिरी:- तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये देखील उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ममता जोशी यांना १ हजार १६० तर शिंदे गटाच्या सौ. बारगुडे यांना ८९२ मते पडली. उद्धव ठाकरे यांच्या गटातील जोशी या २६८ मतांनी विजयी झाल्या.
पोमेंडीमध्ये भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेची युती झाली नाही. त्याचा फटका बसला. भाजपच्या राजश्री कांबळे यांनी सहाशेहून अधिक मते घेतली. तर सदस्यपदी गाव पॅनलचे दिगंबर मयेकर, सायली सुरेश बाणे, राजेंद्र शंकर कदम, विशाल प्रभाकर भारती, प्रांजल प्रशांत खानविलकर, भाजप विजया विजय कांबळे, महाविकास आघाडी नलिनी विनोद कांबळे, राजेंद्र गोपाळ कळंबटे, रेश्मा रमेश कांबळे, प्राजक्ता प्रकाश जोशी हे उमेदवार विजयी जाले. गावपॅनलला बाळासाहेबांची शिवसेनेने पाठिंबा दिला होता.