पेठकिल्ला येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

रत्नागिरी:- शहराजवळील कुरणवाडी-पेठकिल्ला येथील तरुण बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह किल्ला येथील घळीजवळ पाण्यात तरंगताना आढळून आला. प्रणित विश्वंभर भाटकर (वय २४, रा. कुरवणवाडी- पेठकिल्ला, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे
नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २१) कुरणवाडी येथील समुद्र किनारी खडपात सकाळी नऊच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. १९) पहाटे पाचच्या सुमारास मासेमारी करण्यासाठी प्रणित गेला होता. दुपारी दोन वाजेपर्यत घरी आला नाही म्हणून त्याच्या बहिणीने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी बेपत्ताची नोंद करुन घेतली. नातेवाईक, ग्रामस्थ त्याचा शोध घेत होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास नागरिकांना ग्रामस्थांना त्याचा मृतदेह कुरणवाडी येथील समुद्र किनारी खडपात पाण्यात तरंगताना दिसून आला. नागरिकांनी त्याला उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. प्रणितचा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.