रत्नागिरी:- आज सायंकाळी पावस वरून मुंबईला जाणाऱ्या साई तन्मय खासगी ट्रॅव्हलसच्या गाडीला गोळप पुलावर झालेल्या अपघातात गाडी पलटी होऊन गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आठ जणांना किरकोळ मार लागला असून त्यांना उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यातील 5 जणांना उपचारांनंतर घरी सोडून देण्यात आले.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास साई तन्मय या खाजगी ट्रॅव्हल्सची गाडी क्रमांक- MH04-HS-5495 विजयदुर्ग वरून मुंबईला जात असताना गोळप पुलावरून गोळप घाटीत चढत असताना चढावात गाडी न्यूट्रल झाली आणि उलट दिशेने येत पलटी झाली. त्यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गाडीत असलेल्या प्रवाशांपैकी आठ जणांना किरकोळ इजा झाली.
त्यातील एकाला डोक्याला मार लागला. त्यांना रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये
वैशाली मयेकर (20आंबोळगड), दिपक शेडकर (34आडिवरे )शांताराम टुकरूळ (56धाऊलवल्ली ) या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून विधी पेडणेकर (24आंबोळगड) विमल जाधव( 48तिवरे) मनेष तळये (25 कोंडसर खुर्द )सीमा कुवेस्कर (62धाऊलवल्ली) आणि उन्नती गावडे (32 मेर्वी ) या 5 जणांवर प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले.
ही घटना कळताच त्या भागात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केल्यामुळे पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुरेश गावित व श्री देऊस कर यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती आटोक्यात आणली व जखमींना तातडीने उपचाराकरिता पाठवण्यात आले.