रत्नागिरीः– राज्यात निसर्गरम्य समुद्र किनारे, ऐतिहासिक किल्ले, पर्वतरांगा, ऐतिहासिक वारसास्थळे, धरणे अशी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. यातील अनेक ठिकाणी हॉटेलसह निवासस्थानांच्या सोयी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते. पर्यटनाच्या अशा ठिकाणी कॅराव्हॅनच्या सहाय्याने पर्यटकांना निवासाची सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अशी सर्व सोयीसुविधांनी युक्त कॅराव्हॅन प्रथमच गणपतीपुळे येथे दाखल झाली. यावेळी सर्व पर्यटकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
अनेक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी बांधकामासाठी कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यात आले आहेत. अशा ठिकाणी कॅराव्हॅन व कॅराव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना निवासाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अतिदुर्गम भागात हॉटेल, निवासस्थानांसारख्या राहण्याच्या सोयी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी, तसेच ज्या क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी बांधकामासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहेत, अशा ठिकाणी कॅराव्हॅन पर्यटकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतील, अशा स्वरूपाचे राज्य शासनाचे धोरण आहे.घरात किंवा एखाद्या हॉटेलमध्ये ज्या सुविधा असतात, त्या सुविधांप्रमाणे सर्व सुविधा कॅराव्हॅनमध्ये देण्यात आली आहे. सर्व सोयी‚सुविधांनी युक्त अशी ही व्हॅन आहे. पाश्चात्य देशांमध्ये शहरात बंगले असणाऱ्यांनी किंवा डोंगराळ, दुर्गम भागातील रहिवाशांनी आपल्या जागा उपलब्ध करून दिली आहे. या व्हॅनमध्ये टेबल, खुर्ची, छोटे स्वयंपाकघर, दूरचित्रवाणी संच, वीज, शीतकपाट, स्वच्छतागृह, बेड अशा आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहे.