रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील तुरळ मारहाणप्रकरणी न्यायालयाने तरुणाला दहा हजार रुपयांचा दंड व तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली.
संगमेश्वर ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शांताराम भायजे यांच्या बैलाने संशयित नथुराम भागोजी भायजे (वय ४३, रा. तुरळ, मराठवाडी) यांचे येथील १७ पेंढ्याची १७ ऑक्टोबरला नासधूस केली होती. नथुराम भायजे यांनी शांताराम भायजे व त्यांच्या पत्नीला मारहाण केली होती.
शांताराम भायजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, नथुराम यांच्याविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी सरकारी वकील सुप्रिया वनकर, प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक सुरेश गावीत, कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलिस हवालदार साक्षी कामेरकर यांनी काम पाहिले.