संगमेश्वर:- सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास रसायन जोगीन मंदिराजवळ नागझरी निवे बुद्रुक येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या धडकेत तरुण ठार झाला आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव मीलन जसबीर बोहरा असे आहे.
मीलन बोहरा हा युवक बजाज पल्सर हे दुचाकी वाहन चालवीत होता. तर नितीन कृष्णा मोहिते ४१ वर्षीय इसम बोलेरो पिक अप चारचाकी वाहन चालवीत होते. रात्री साडेअकराच्या सुमारास या दोन वाहनांची एकमेकांना जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला.
मंगळवारी देवरूख पोलिस ठाणे येथे संबंधित अपघाताची नोंद करुन नितीन कृष्णा मोहिते या बोलोरो पिक अप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी व तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. नामदेव जाधव हे करीत आहे. याबाबत शांताराम तुकाराम इप्ते यांनी देवरुख पोलीस ठाण्यात खबर दिली आहे