रत्नागिरी:- रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील नाणीजजवळ रस्ता खचल्याने या महामार्गावरील वाहतूकीवर गुरुवार रात्रीपासून माेठा परिणाम झाला आहे. नाणीज येथील माध्यमिक शाळेसमोरील रस्ता खचल्याने राज्य महामार्ग रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक पालीपासून लांजा – दाभोळ या पर्यायी मार्गाने सुरु करण्यात आली आहे.
पावसामुळे राज्य महामार्ग क्रमांक 166 पाली ते साखरपा गाव दरम्यान नाणीज येथील माध्यमिक शाळेसमोरील रस्ता खचल्याने राज्य महामार्ग रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत वाहतुक बंद करण्यात आली आहे. मुंबई व रत्नागिरीकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक पाली पासून लांजा – दाभोळ मार्गे कोल्हापूर दिशेने वळविण्यात आलेली आहे. कोल्हापूरकडून येणारी वाहतूक दाभोळ फाटा – लांजा – मार्गाने वळविण्यात आलेली आहे.
महामार्गाचे काम सुरु असल्याने रस्त्यावर मातीचा भराव टाकण्यात आला आहे. दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील नाणीज येथील माध्यमिक शाळेसमोरील रस्ता गुरुवारी रात्रीच्या सुमारास खचला. सध्या मिऱ्या ते नागपूर जाणाऱ्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आहे सुरु आहे. रात्री साडेबारा वाजल्यापासून कोल्हापूरकडे आणि रत्नागिरीकडे येणारी वाहतुक ठप्प झाली होती. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ठेकेदाराकडून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली. दरम्यान यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.