रत्नागिरी:- तालुक्यातील नाणीज तळवाडी येथे घराचा दरवाजा उघडा असताना चोरट्याने घरात प्रवेश करुन कपाटातील लॉकर मधील १ लाख १५० रुपयांचे दागिने पळविले. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास संसारे ( रा. नाणीज-रत्नागिरी पुर्ण नाव माहित नाही) असा संशयित आहे. ही घटना २६ ते ३० मे २०२४ या कालावधीत घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची सासू एकटीच घरी असताना गावातील राहणारा संशयित कैलास याने घराचा दरवाजा उघडा असताना घरात प्रवेश करुन घरातील कपाटाचे लॉकर मध्ये ठेवलेले १ लाख १५० रुपयांचे सोन्याचे दागिने पळविले. या प्रकरणी फिर्यादी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.