रत्नागिरी:- नागपुर ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला १ मार्च २०२३ ते ८ जुन २०२३ आणि १० जुन २०२३ ते १ जुलै २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खान्देश, विदर्भला जोडणारी गाडी कोकणाला जोडणारी आहे.
खान्देश,विदर्भातुन थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी उपलब्ध नसल्याने अशा रेल्वेची मागणी वारंवार रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात होती होळी, गुढीपाडवा पार्श्वभूमीवर आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी नागपुर ते मडगाव (गोवा) अशी चालवण्यास सुरवात झाली. त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपुर येथून दर बुधवारी व शनिवारी दुपारी ३.0५ वाजता सुटून गुरुवारी, रविवारी मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.४६ वाजता पोहोचेल. मडगाव ते नागपुर दरम्यान धावताना ही गाडी गुरुवारी, रविवारी मडगाव गोवा येथून रात्री ८.०१ मिनीटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०९.३१ वाजता नागपुर येथे पोहोचेल. नागपुर ते मडगाव (गोवा) या प्रवासात गाडी वर्धा जं, पुलगाव, धामणगाव, बडनेरा जं, अकोला जं, शेगांव, मलकापूर, भुसावळ जं, नाशिक रोड, ईगतपुरी, कल्याण जं, पनवेल जं, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवीम, करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.